६३६. स्वर्गीय आनंद

मराठी

६३६. स्वर्गीय आनंद सुवंद्य, सुवंद्य, सकळ म्हणती, मुकुट टाकीती प्रभूपुढें ... १ प्रेमाचे पाझर सुटती अपार, जयजयकार परेशाचा ... २ संतांच्या अश्रूंना प्रभू स्वतां पुशी, कुरवाळी त्यांसी बहू प्रेमे ... ३ शुभ वस्त्रे तारणाची लेती, अंगिं आनंदें वंदिति प्रभुलागी ... ४ आनंद, आनंद, आनंद, आनंद पवित्र आनंद सर्वकाळ ... ५ अनंतकाळ तें सुख भोगतील, कधीं न पडेल उणें त्यांत ... ६ ऐशा स्थळीं, देवा, मजला तुं न्यावें प्रार्थितों मी भावें, कृपासिंधू ... ७ --- कृ. र. सांगळे