मराठी
३३८. स्वर्गाची पवित्रता
पवित्र तो देव, पवित्र ते दूत,
पवित्रच भक्त सोबतीला ... १
पवित्र नगर, पवित्र देऊळ,
रस्तेही सीजवळ त्या गावांचे ... २
पवित्र आसन, पवित्र पाळक,
तो गुरु नायक ख्रिस्त माझा ... ३
पवित्र तो बोध, पवित्र ती वाणी
पवित्रच कानीं पडतसे ... ४
पवित्र गायन, मंजुळ सुस्वर
नाना वाद्यांवर वाजविती ... ५
--- कृ. र. सांगळे