मराठी
६३९. स्वर्गीय आनंद
परलोकीं आनंद सदोदित ... ध्रु
चिंता, दुःखे, षडीपू, यांना
होय सदा प्रतिबंध ... १
आप्त मित्र हे भेटुनी प्रेमें
गाती नित्य प्रबंध ... २
गुरुज्ञानामृत प्राशुनी वाढे
भक्तांची मती मंद ... ३
विकसित राहे अंतरीं शांती
सहवासें सुखकंद ... ४
ख्रिस्तासन्निध सतत राहतां
लागे तप्तदछंद ... ५
---- सु. वि. करमरकर