मराठी
६४०. जगिं चिरकाल राहण्याची इच्छा नसणे
जगांत रहाया न मागेन मी,
अंधार, विपत्ती पुढें नेहमी
जीवास सदा दुश्रींता, दुःखें,
दुर्लभ्य चुकोनि घडावी सुखें ... १
जगांत रहाया न मागेन मी,
कीं मोहिं व पाशीं झुंजें मी श्रमी,
पापेंच दीनां भीती उद्भवते,
पापेंहि भक्तांची शांती लोपते ... २
जगांत रहाया न मागेन मी,
हा आत्मा थड्यांत जसा आश्रमी
प्रभू येशूसंगतीं स्वसथ निजे,
त्यासंगतीं गौरवीं पुन्हा उठे ... ३
जगांत रहाया न मागे अतां
अनुज्ञा देवाची मी जाईं होतां,
हे चालले संत धरुनी धीरा,
कां मार्ग क्रमाया करूं उशिरा ... ४
जगिं कां रहावें घरी क्षणिकी
जाईं अक्षयी सदनी मी सुखी
पावेन तिथें प्रभुप्रितिपदा ,
घेई चव दिव्य सुखाची तदा ... ५
देवाचे सत्पुत्र तिथें मिळुनी
प्रभुपाशीं राहती तै रमूनी,
सहर्ष, सप्रेम सदा पितया
ते गाती, स्तविती सेविती तया ... ६
---- एच. बॅलेंटाइन