६४१. स्वर्गींचा प्रवासी

मराठी

६४१. स्वर्गींचा प्रवासी मी विदेशी व मी प्रवासी येथें राहें, येथें राहे एक रात त्वरेने जाई स्वर्गगेहासी तेथे विराजे प्रभू प्रकाशी ... १ मी विदेशी व मी प्रवासी, येथे राहें, येथें राहें एक रात ... ध्रु श्रेष्ठ तेथे किती विश्रांती माझें चित्त, माझे चित्त त्यावरी भवसमुद्री सतत भ्रांती, न हिंडुनिया जगिं सुशांती ... २ मी उल्हासी चढे स्वर्गासी, माझा प्रभू, माझा प्रभू तै दिसे न दुःख लागे, न शत्रू त्रासी, न अश्रू गाळी, न मृत्यू ग्रासी ... ३ ---- एच. बॅलेंटाइन