६४२. अनंत सौख्य

मराठी

६४२. अनंत सौख्य ऐहिक दुःखभार क्षणांत गुजरे, शोक, वियोग संपणार, हा काळही सारे ... १ संकट कीं व्यथा क्षणीही संपती पीडा, दुःखे, अशांतता, टळूनी हि जाती ... २ जाईल सर्व हे अनंत तै विश्राम, दुतांसवें रमु सुखी स्तवुनी ख्रिस्तनाम ... ३ वस्ती अनंत ती, अनंत मोद तो प्रभू अनंत तेजस्वी, स्वर्गास व्यापितो ... ४ ---- आ. मा. सांगळे