६४३. स्वर्ग हे हर्षस्थान

मराठी

६४३. स्वर्ग हे हर्षस्थान दुःख जगिं येतसे, हा वियोग होतसे, न स्वर्गी शिरणार ... १ हर्ष, तैं किती हो हर्ष, हर्ष, हर्ष हर्ष, तै किती हो स्वर्गी सर्व भेटणार ... ध्रु देवभक्त, संत जण स्वर्गीं या मिळेल स्थान, देवास पाहणार .. २ जे तरुण सत्वरी घेती ख्रिस्त अंतरी ते स्वर्गीं भेटणार ... ३ जे मुलांस देती ज्ञान, आईबाप, गुरु जाण, ते सर्व भेटणार ... ४ येशू ख्रिस्त हा दिसे, तो सिंहासनी वसे, आम्हां स्वीकारणार ... ५ गाऊ स्वर्गीं गायने, येशूख्रिस्तस्तवने, करून वंदणार ... ६ --- एच. बॅलेंटाइन ----