६४४. स्वर्गमार्गक्रमण

मराठी

६४४. स्वर्गमार्गक्रमण स्वर्गास जावया मीं वाट धरिली, आनंद होई क्रमितां कीं येईं जवळी ... १ तेथें न दुःख ये, तेथें न दुःख ये स्वर्गांत प्रीती नांदते, तेथें न दुःख ये ... ध्रु हो देवधाम तें वस्त्या किती, किती अनंत जीवना तिथें सत्संत सेविती ... २ त्या गेहीं पोंचूनि जाईल दुःखभार, खांबीचें क्लेश संपुनि किरीट शोभणार ... ३ मध्ये परी दिसे मृत्युनदिप्रसार, जाईन पार तोंवरी न पावें सौख्य थोर ... ४ बापा, सदा सदा विश्वास वाढवी, मृत्यूतीरास पोंचता मनांस शांतवी ... ५ ----- मेरी इ. बिसल