६४५. ख्रिस्तशिष्याचें गेहीं

मराठी

६४५. ख्रिस्तशिष्याचें गेहीं ख्रिस्तशिष्याचिया गेहीं विश्रांतीचा सन्निधीं, तारणारा तेथें राही, तो मनीषा संपादि ... १ श्रांत पावे विसावा, श्रांत पावे विसावा, पूर्ण तेथें विसावा तुंही पावशी ... ध्रु पैलतीरी यार्देनेचें, एदेनाच्या उद्यानी, रम्य पुष्पें जीवनाचिं दिव्य वृक्षालागोनी ... २ सिद्ध माझया मंदिरातें तो करील नेटके राहणारे सर्वदा तें हे मला हो ठाऊक ... ३ त्या पवित्री रमयिं देशीं, त्या सुखाच्या माहेरी वास नाहीं क्षणध्वंसी अक्षयत्वामाझारी ... ४ मृत्यूलाही मृत्यू आला हिनशक्ती तदबाहू गीत, मुक्तांनो ख्रिस्ताला बालसुर्या गा पाहुं ... ५ ---- ना. वा. टिळक