६४६. हर्षित भक्तांचा उत्सव

मराठी

६४६. हर्षित भक्तांचा उत्सव हर्षवान, हर्षवान, या सत्वरी ईश्वरा भेटण्याला जाऊ वरी येशू बोलावी, अहो वरी या, हर्षवान, हर्षवान, प्रसाद घ्या तूर्त हे मर्त्य शरीर पडेल, तूर्त हा आत्मा स्वर्गास चढेल, येशू सभाव स्वीकारु तरी हर्षवान, हर्षवान, जाऊं वरी ... १ स्वर्गीं भक्तांचे बहू समुदाय ख्रिस्ता स्तवुनी अलिंगिती पाय गाती आम्हांस अहो त्वरें या, हर्षवान, हर्षवान, प्रसाद घ्या कानीं ती गायने येति मधुर वाटतें मानसी, कां बसूं दूर स्वर्गीं त्यासंगतीं काढूं स्वरा, हर्षवान, हर्षवान, करूं त्वरा ... २ ख्रिस्त मृत्यूवरी पावला जय, गेलें हो गेलें मृत्यूचे भय पाडिलें गर्तेमध्ये प्रकाशा हर्षवान, हर्षवान, या आकाशा पोंचूनि पावू आनंद महान हिंदू सर्वत्रची टेन रम्य स्थान, येशूचा पाहुनी सलोमभाव, हर्षवान, हर्षवान, वंदू टेन नाव ...३ ---- एच. बॅलेंटाईन