६४७. दिव्य नदीचा दृष्टांत

मराठी

६४७. दिव्य नदीचा दृष्टांत स्वर्गातुनी दिव्य नदी वाहे निर्मला सदा, तिच्या तीरीं मिळुनियां त्या स्थळा पाहुं कदा ... १ तेथें आम्ही सर्व मिळू सुरम्य त्या नदीतीरासी मिळू स्वर्गीं देवभक्तांस मिळू, स्तृती अर्पू ईश्वरा ... ध्रु भक्तिभाव बाळगूनी ख्रिस्ता सर्वदा स्तवु शुद्ध जीवना पिउनि धान्य तैं किती होऊ ... २ लोकीं पाप सोडण्याला येशू शक्ती पुरवी, तेथें पोंचवीं आम्हाला, वसनें दे तेजस्वी ... ३ येशुप्रेम वर्णिताना गाती संत सर्वकाळ, मृत्यू ये कधी न त्यांना नाहीं त्यां वियोगकाळ ... ४ आम्ही वाट त्रमुनियां सोडूं सत्वरी हें रान पोंचूनि नदीतीराला पूर्ण पावू समाधान ... ५ ----- मेरी इ. बिसल