६४८. विश्वासरुपी नेत्रानें दिसणारा देश

मराठी

६४८. विश्वासरुपी नेत्रानें दिसणारा देश विश्वासें जो देश दिसतो प्रकाशयुक्त रम्य तो पवित्रही तेथें राहती, ते संकट दुःख नेणती ... १ येतां काय येतां काय तेथें राहायास येतां काय येतां काय येतां काय मजबरोबर या ... ध्रु त्या सुंदर देशी जाती पार न त्यांस रात्र भासणार, कि ईश्वर तेथ राहतो, स्वतेजें स्वर्गांस व्यापितो ... २ नदी नितळा संजीवनी वाहे त्या देशातुनि, तो तरू आरोग्य विस्तरी, रस्तेही तेथील सोनेरी ... ३ तिथें भक्तवृंद नांदती, वस्त्रीही शुभ्र शोभती, ते गायन गाती सगळे, कीं प्रभुकृपेने तारिले ... ४ ---- मेरी इ. बिसल