मराठी
६५०. सदाश्रय
प्रिय प्रभूच्या हातीं
सुरक्षितसा मी.
माझ्या जिवा विश्रांती
होईल नेहमी
स्वर्गात दिव्य प्राणी
सुखांत नांदती
ते प्रभूला स्तवुनी
आनंदे म्हणती ... १
प्रिय प्रभूच्या हातीं
सुरक्षितसा मी.
माझ्या जिवा विश्रांती
होईल नेहमी ... ध्रु
सुरक्षितसा आतां
गेला तो पापभार,
ऐहिक नाहीं चिंता,
मोह न लागणार
हि भवदुःखें सारीं
प्रभूने वारिली,
तो मला तृप्त करी
आशा हि लागली ... २
सुरक्षितसा ठेवी
तूं प्रभू, सदाश्रय,
प्रेमाची छाया व्हावी,
मजवरी अक्षय
उद्धरिले तूं मला
स्वप्राण देउनी,
ये सुदिनी न्यायाला
त्या सौख्यसदनी ... ३
--- मेरी इ. बिसल