६५१. सुंदर शियोन नगर

मराठी

६५१. सुंदर शियोन नगर सुंदर दिव्य नागरी सुंदर वस्ती ईश्वरी सुंदर मार्ग जाती पार, सुंदर वेस मोतीदार प्रभू क्रुसाशी खिळीला तो उघडील तें मला ... १ सुंदर राजा वैभवी, सुंदर दूत तेजस्वी सुंदर भक्त वंदिती, सुंदर वाद्यें वाजती, सुंदर मी वीणा घेई मिळुनी त्या ख्रिस्ता स्तवी ... २ सुंदर काय धारणीं, सुंदर कंठ भूषणीं, सुंदर वस्त्री राजती सुंदर गान अर्पिती प्रभू येशूच वैभवी भक्ताला नेई गौरवी ... ३ सुंदर मंदिरी रमू , सुंदर देवळी नमु , सुंदर प्रीती अंतरी, सुंदर सर्वतोपरी सर्व प्रभू प्रकाशवी, मानसी आस पुरवी ... ४ ---- एमिली आर. बिसल