६५२. नवें यरुशलेम

मराठी

६५२. नवें यरुशलेम यरुशलेम, यरुशलेम हें फार प्रिय नाव, तिच्यांत मिळे मोठें क्षेम, विश्रांतीचा तो ठाव ... १ माझ्या देवाच्या नगरीं, तूं केव्हा दिसशील तेथील भक्त ईश्वरी केव्हां आढळतील ... २ तुझ्या कोटांचे मोठें बळ, तुझें मोत्यांचे द्वार सोन्याचे रस्तेहीँ सोज्वळ, मी केव्हा पाहाणार ... ३ तेथें सत्सुखं आहे थोर कशीं न कोमते, तें पावायाला दुःख घोर जगांत लागते ... ४ होवो मला सोसाया धीर कधी न वाटो भय, प्रभुचिं वचनें खंबीर, मला मिळेल जय ... ५ यरुशलेम यरुशलेम हें फार प्रियं नाव, तिच्यांत मिळे मोठें क्षेम विश्रांतीचा तो ठाव ... ६ ----- एच बॅलेंटाईन