६५३. स्वर्गीय भक्तांचे सौख्य

मराठी

६५३. स्वर्गीय भक्तांचे सौख्य स्वर्गी देवासंगतीं भक्त राहाती सदा, देवप्रीती भोगिती दिव्य तेजीं सर्वदा .. १ पूर्वीं राहुनी जगिं त्यांनी क्लेशा साहिलें, तुछ, नीच, क्षुद्र, ते पातकी मानियेले ... १ पार ते आतां गेले, संपली दुःखे सारी. पापमोह संपले मुक्त हर्षति तरी गाती दूतांसंगती वर्णीती उद्धाराला ईशकृपा वंदिति येशूख्रिस्तप्रेमाला ... २ ख्रिस्त देई विश्रामा अश्रू सारे पुशी तो ख्रिस्तपायी रंगतीं त्यांस प्रेमें व्यापी तो शांती तेथें नांदती संत सौख्या सेविती ईश्वरी प्रसन्नता संतसंघ भोगिती ... ३ ---एमिली आर. बिसल