मराठी
६५४. स्वर्गीय भक्त
पाहा, ते स्वर्गांत कोण
अगणित समुदाय
ल्याले शुभ्र पांघरूण
धरिती ख्रिस्ताचे पाय
ते हें गाती ह्यासमोर
योग्य आहे कोकरा
द्या हो त्याला मान थोर,
स्तवा परमेश्वरा ... १
ते महाकष्टातुनी
कृपे पावुनी निभाव
आले ख्रिस्तसदनी
कां कपाळी त्याचें नांव
शुभ झगे ल्याले ते,
जयध्वजा धरिती
जयवंत पुरते
ख्रिस्तापाशीं ठरती ... २
आतां नाहीं, तान्ह भूक,
उन्ह नाहीं लागणार,
प्रभू देई मोठें सुख,
जीवनाचें पाणी फार
त्यांच्या अंतःकरणी
हर्ष सदा असतो,
प्रभू अश्रू पुसुनी
समाधान करितो ... ३
----- एच. बॅलेंटाईन