६५६. परमेशाचें स्तवन

मराठी

६५६. परमेशाचें स्तवन परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा ... ध्रु नित्य तयाच्या पवित्र स्थानीं जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसर तयाचा आणून ध्यानी स्तवा, वर्णा त्याचे प्रताप, महती गाऊन त्याला स्तवा, करणा, वीणा, सतार घेऊन जगदीशाला स्तवा ... १ वाजवुनियां मृदूंग, करुनि नर्तन त्याला स्तवा, तंत्रयंत्रवाद्यांच्या नादें विश्वपतीला स्तवा, मंजूध्वनीचा उंचध्वनीच्या झंजावार त्या स्तवा, प्राणिमात्र हो, स्तदा परेशा, परमेशाला स्तवा ... २ ---- ना. वा . टिळक