६५७. श्रीप्रभूचें आज्ञापालन

मराठी

६५७. श्रीप्रभूचें आज्ञापालन आज्ञा श्रीप्रभुची, मुलांनो, वंद्य असो साची ... ध्रु नका धरुं जगिं परमेशावीण भीती कवणाची, मुलांनो, भीती कवणाची आज्ञा श्रीप्रभुची ... १ सदा करावी सेवा जगती जननीजनकाची, मुलांनो, जननीजनकाची आज्ञा श्रीप्रभुची ... २ स्वतःपरी शेजार्याठयी प्रीती करा मनींची, मुलांनो, प्रीती करा मनिची आज्ञा श्रीप्रभुची ... ३ ---- मी. ल. गायकवाड