मराठी
६५८. प्रार्थना करायला शिकणें
देवराया, आम्ही दिन
दयासागरीचे मीन ... १
तूंच सांग लेकरांना
कशी करावी प्रार्थना ... २
तुझा आशीर्वाद व्हवा
जीव त्यामाजीं रंगावा ... ३
प्रार्थनेचें अन्न खावे
सिद्ध व्हावे तुझ्या सेवे ... ४
दास म्हणे, रात्रंदिन
तुझें घडावें चिंतन ... ५
---- ना. वा. टिळक