मराठी
६५९. पश्चातापयुक्त प्रार्थना
तूंचि माझा मायबाप,
क्षमा करीं माझे पाप ... १
कोण्या तोंडें प्रार्थू तुज
नसे अधिकार मज ... २
सर्व पापें पदरीं घेतो,
दान क्षमेचे मागतों ... ३
पापी, भ्रष्ट मी लाचार
ख्रिस्तासाठी अंगीकार ... ४
---- कृ. र. सांगळे