मराठी
६६०. विश्रामवार
आम्ही सारे यात्रेकरू,
संसारीचें वाटसरुं ... १
आम्ही जातो अमुच्या गावां,
तेथें अक्षयतेचा ठेवा ... २
सहा वार चाळण्यांत,
सुखें दुःखें भोगण्यांत ... ३
सातवा हा विश्रांतीचा,
आम्हां देवदर्शनाचा ... ४
सहा वारांचे सासर,
सातव्याला ये माहेर ... ५
दास म्हणे, योजी देव,
तें तें अवघे अभिनव ... ६
--- ना. वा. टिळक