६६१. प्रभूसेवेस पाचारण

मराठी

६६१. प्रभूसेवेस पाचारण याहो, याहो, याहो, प्रियजन यत्ना, साधू याहो, अनुदिन ख्रिस्ती कार्ये परमहीतें परिणत अभिमत देवातें ... ध्रु ख्रिस्त पुढें हा सेनानी, रत आपण सारे अनुगमनी, मित्र समस्तां तो मानी, प्रभूवर करी निजकार्यातें या हो भयहत, सारे जग अघभारे अवनत बोलावी गर्जा जयजय आनंदे, सारें प्रभुचरणा साधें, पावे आघ लय दुःखें, मृती, भय ऐशा शुभमय यत्नातें अविरत करूं करू, जगदधिपती बघूं प्रियतम गुरु प्रभुरायातें ... १ --- ना. वा. टिळक