६६३. सत्यप्रियतेची महती

मराठी

६६३. सत्यप्रियतेची महती धरीं मनीं खरेपण, बाळा, सांभाळ सदा, वेल्हाळा या घना ... ध्रु खेळता खेळ बाळांत, वा रमता संसारांत बाळका, झटुनिया हे तुझे दिव्य सर्वदा करी कर्तव्य, बाळका सदभाव तुझा पाहुनी हर्षूनी मनीं तुला वेल्हाळा, तुला वेल्हाळा, दूतांचा गाईल मेळा ऐक ना ... १ मनीं धरी खरेपण आतां मग होवो जीवही जातां, बाळका हें असे न सोपे काहीं परी साह्य तुला प्रभू राही सर्वदा पुसुनिया तुझ्या आसवां धीरही नवा तोच रे तुजला, तोच रे तुजला देईल जिंकण्या काळा ऐक ना ... २ तूं शिष्य कुणाचा त्याचा जो काळ असे काळाचा, बाळका त्यावरी ठेवुनी भावा संसार तरून हा जावा, बाळका सर्वदा तरी अंतरीं खरेपण धरी यांत, वेल्हाळा, यांत, वेल्हाळा, हो धर्मही सारा गोळा ऐक ना ... ३ --- शा. द. उजगरे