६६४. मातेंचें प्रेम

मराठी

६६४. मातेंचें प्रेम किती गणू तुझ्या, प्रिय आई, उपकारां, सीमा नाहीं ह्या जगिं ... ध्रु मी दुरबल, पंगू, अल्प, तव हृदयाचें मधू तल्प तैं मला, मधू स्तन्य तुझें मम अन्न तूं गणीशीं मजला प्राण आपुला उपवास किती जागरणे, आश्रुंची दानें अहा मज पायिं अहा मज पायिं तव शरीर नच अधेही राहिले ... १ सानंद चुंबितां मजला अमृताचें स्मरण न तुजला, माउली मी हस्तां जणूं तुजपुढतीं चंद्राची उगवे पंक्ती, माउली परी मला ऐकुनी रडतां फाटते आतां जणू वसुधाहि, जणू वसुधाहि तुज वाटे प्रियकर आई, भीतिने ... २ लघुबीज, रोपटें, वृक्ष, हीं तिन्ही एक प्रत्यक्ष, तुजपुढें तुजपुढें कशाचें तूंच यामध्ये वसशी साच, माउली बोलतो काय मी वेडा तर्क हि थोडा कसा मज होई, कसा मज होई, आईपण जाणें आई, ऐकली ... ३ जग म्हणो मला किती थोर, मज तुझें नेणते पोर राहूं दे, जगी चढलो उच्चं पदातें तरी तुझिया अंकी मातें, लोळू दे ऐकवी तुझी ती वाणी, सरस मधू गाणी मला तूं गाई, मला तूं गाई, म्हण मला सुखें अंगाई, माउली ... ४ ---- ना. वा. टिळक