मराठी
६६५. मातृप्रेमाचें वर्णन
मायलेकरूं यांचें नातें
दिक्कालाला भेटून उरते
यांत न शंका तुझा नसे का
मजवर सारा जीव ... १
तूं मजकरितां मार्ग आखिल,
तूंच तयांतुन नेशी मजला
अये खरोखर तुझा निरंतर
मजवर सारा जीव ... २
हीं मायेची, मनधरणीची,
हीं रागाची, अधिकाराची
वचनें वदशी, सदैव धरीशी
मजवर सारा जीव ... ३
तव वात्सल्ये मज पढवीला
माय म्हणाया परमेशाला
मजला अनुभव कसा असा तव
मजवर सारा जीव ... ४
---- ना. वा. टिळक