मराठी
६६६. ख्रिस्ताचा पाळणा
बाळा जो जो रे प्रिय ख्रिस्ता,
दुरितभयाच्या अस्ता ... ध्रु
जे जे श्रमलेले ते घाले
तव चरणींच निमाले ... १
त्यजिलें पापानें, संस्तवने
तव करिति हर्षाने ... २
सोडून दिव्याला स्वर्गाला
गोष्टीं प्रियकर रमला ... ३
बाळा कवणाचा मातेचा
किंवा तू जगताचा ... ४
जगताच्या राया कृतकर्या
निजवी गाऊन मार्या ... ५
---- ना. वा. टिळक