६६७. स्वर्गीय स्तवन

मराठी

६६७. स्वर्गीय स्तवन ऐका, द्या द्या ध्याना, कलरव, ऐका साध्या ताना अभिनव, ऐका दिव्यें रसभरितें अनुपम मधुतम संगीतें ... ध्रु व्योम निनादे व्यापिलें गृहमंडळ तेणें दणदणलें, स्वर्गंधरेला जोडिलें अनुपम मधुतम संगीतें नाचे थयथय सारें जग, मज भासे सहसीत आनंदे स्वर्गीं जयजय देवातें शांती वसुमती, घे तूतें, पावे नर अनुकंपा, सुखकर गाणें शुभमय ऐका तें प्रभू धरी नरतनू निरखूनि अजि जणूं स्थिरचर करी अनुगानातें ... १ ---- ना. वा. टिळक