६६९. मुलांचे प्रभुस्तवन

मराठी

६६९. मुलांचे प्रभुस्तवन उद्धार घेउनियां ये प्रभू देवळीं तै बाळें येऊनियां स्तवाया लागली ... १ तीन गर्जती, होसान्ना भेटती प्रभूला, त्या त्यांच्या रम्य गाना प्रभूहि लोभला ... ध्रु आतां तो तेजवंत स्वर्गात राहतो, मुलांना तो अत्यंत सुप्रिय मानितो ... २ आम्ही लागूनी पायां येशूला देऊं मान, त्या नामा वंदायाला प्रेमाने अर्पू प्राण .... ३ केवळ बोलण्याने होती न स्तवने, संपूर्ण हृदयाने करूचं वंदने ... ४ जरी आम्हाकडूनि वंदने न होतील, धोंडे हे ओरडुनी प्रभूला वंदतील ... ५ ----- एच. बॅलेंटाईन