मराठी
६७०. ख्रिस्तप्रभूचे सामर्थ्य
प्रभू नृपती जगिं राज्य करीं,
ध्वजा प्रेम हें सर्वदा पसरी
जया मिळवू दुष्ट बुद्धीवरी,
प्रभू पुरवी बळ मागु तरी ... १
चला सुवृत्त जगिं गाजवा
कीं राजा पाही निजबाळका
चला पुढें, भय दुरी सारा,
आम्ही जिंकू प्रभू दे आधारा ... ध्रु
मुलांनो, उठा, कळवा सकलां
कीं येशूबळें हटवू अरीला
किती प्रभूच्या शक्तीला नेणती,
कीं येशू करी नष्ट दुष्टमती ... २
--- एमिली आर. बिसल