मराठी
६७१. दानियेलाचें अनुकरण
इशाज्ञांना स्मरुनी
सर्वदा मानी,
दानिएल सेना ती
सतावु या गर्जुनी ... १
शूर दानिएल
शूर एकला
शूर तुम्ही होता का
शूर हेतूला ... ध्रु
नाना वीर सोडीती
धैर्य भिउनि,
दानिएल सेना ती
हो शूर मिळुनी ... २
पापदैत्य भुवनी
ग्रासी मोहुनी
दानिएल सेना ही
त्या नाशी भिडुनी ... ३
जयध्वजा उभारा,
ख्रिस्त ये जनीं
दानिएल सेनाला
दे वृद्धी पावनी ... ४
---- सु. वि. करमरकर