मराठी
६७२. ख्रिस्तसेना
ख्रिस्तसेना हो आम्ही
पुढें चाललों,
दिव्य शास्त्रें घेऊनि
युद्धाला जुपलों
आम्ही राजनिष्ठ, जाण,
सैन्याचा ख्रिस्ताधार,
त्यावरीच टेंकूनी
जयाला पावणार ... १
गाऊं डौले थाटुनी,
ख्रिस्ता गौरवू
जयजयकार गर्जुनी
निशाण उभारू ... ध्रु
ख्रिस्तसेना हो आम्ही,
विश्वासू खरे,
साऱ्या शक्तीने झुंजू
कार्यासक्त पुरे
शत्रू टपती जरी
आम्हीही जपातों,
प्रार्थनेंत सामर्थ्ये
तयांना जिंकितों ... २
ख्रिस्तसेना हो आम्ही,
ख्रिस्त सेनानी,
त्याला योग्य होऊनि,
झुंजू रणांगणी
पुढे स्वर्गी सर्वकाळ
उल्हासें गाउनी
पिता, पुत्र, आत्म्याला
स्तवु हो वंदूनि ... ३
----- --- एमिली आर. बिसल