मराठी
६७३. पापांगिकार
येशू प्रिय तारका
पाहीन दिन बाळका,
पापी मी, तुझ्यासमोर
केलीं पातके अघोर
या अयोग्य पामरा
तूंचि तारिता खरा ... १
तूं जगांत राहशी,
दुःखभार वाहीशी
दुर्जनी परिक्षिले,
मोहजाल मांडिलें,
यामुळें तुला अति
माझी किव वाटती ... २
मी खराच पातकीं,
दुष्ट आत्मघातकी,
तूं परंतु पावशी,
प्रेमसिंधु धावशी,
आस तूंच दाविशी,
प्राण देशी तारीशी ... ३
----- --- एमिली आर. बिसल