मराठी
६७४. लहान गोष्टीचें महत्त्व
अणुरेणू यांचा
होई पृथ्वीगोल,
थेंब थेंब यांचा
तो समुद्र खोल ... १
केवढी पळांची
दिसण्यांत माल
हो परी तयांचा
तो अनंत काळ ... २
पातकें मुलांना
दिसती लहान
हो परी तयांनी
दंड ना महान ... ३
प्रेमयुक्त कृत्यें
पेरीं तूं जनीं
होई पृथ्वी जैशी
स्वर्गवासिनी ... ४
शास्त्रबीज टाका
सर्व देशीं दूर,
गाजवा सुवार्ता,
सौख्य होई थोर ... ५
----- --- एमिली आर. बिसल