मराठी
६७५. धर्मादाय
थेंब थेंब साचती,
त्यांचे ओघ वाहती,
तेही ओघ मिळुनी
हो नदीचं भरुनी ... १
धर्मादाय करितां
एक एक टाकितां
अंती येतसे किती
मोठी कार्ये साधिती ... २
देववेल तेंच द्या,
धर्मकाज साधूं या,
ख्रिस्तप्रीती आठवा,
प्रीती तुम्ही दाखवा ... ३
----- एच. बॅलेंटाईन