मराठी
६७६. ख्रिस्तजयंती
गोष्ठी ठेविती बाळा
पूर्वकाळी येशूला,
हि ख्रिस्तजयंती
पाळणा हा मौजेचा
पाहारा तो बैलांचा
ऐशी ती जयंती,
ती ख्रिस्तजयंती ... १
तेजोमय दर्शनें
मेंढपाळी आस्थेने
शोधिलें त्या बाळा
तारा दावी साधूंना
ते अर्पिती दानांना,
ऐशी ती जयंती
ती ख्रिस्तजयंती ... २
बाळ जन्मे त्या दिनीं
ईशस्तुति मेदिनी
गाती आनंदाने
या बाळांनो मिळुनी
येशूबाळा वंदूनि
वर्णू ती जयंती
ती ख्रिस्तजयंती ... ३
----- --- एमिली आर. बिसल