मराठी
6७७. प्रभुचिं बालरत्नें
प्रभू येई, प्रभू येई,
शोधी अपुली रत्नें,
बहुमोली प्रिय रत्नें
आवडतीं तया ... १
तारका सुप्रभाती
चमचमती सार्वत्री,
तशीं रत्नें हीं मुगुटीं
प्रभूच्या शोभती ... ध्रु
प्रभू वेंची, प्रभू वेंची
आपुलीं रत्नें सारी
लेखलखतीं खरीं रत्नें
आवडतीं तया ... २
लघु बाळें, लघु बाळें,
लघु भक्त प्रभूचे
प्रिय रत्नें प्रभूची ती
आवडतीं तया ... ३
----- --- एमिली आर. बिसल