६७९. सायंकाळची प्रार्थना

मराठी

६७९. सायंकाळची प्रार्थना वेळ झोपेची जाहालीं, निजतों मी, वत्सला दीन आत्मा माझा पाळीं रक्षीं तुझ्या तूं बाळा ... १ रक्षीं बापा, रक्षीं बापा, रक्षीं, बापा लेकरा ... ध्रु तेज प्रातःकाळचें तें फांकतां मी उठून प्रेममार्गाने यात्रेतें जीवनाच्या क्रमिन ... २ ह्याच मार्गाने चालाया साह्य देईं विश्वेशा आठवोनि येशूराया पुरविता हो आशा ... ३ ---- ना. वा. टिळक