६८०. स्वर्गमार्गाविषयी संवाद

मराठी

६८०. स्वर्गमार्गाविषयी संवाद बहिणींनो, सांगा जात हो कुठें तोंड फ़िरवुनी सूर्याच्या वाटें पृथ्वीवरी पाहा रात्रीचा अंधार, वाटसरू आम्ही तेज शोधणार ... १ सुखानंदे जातो वाट क्रमूनि, प्रेमानंदें गातों ख्रिस्ता स्तवुनी ... ध्रु बहिणींनो, सांगा काय हो मनीं धरुनी निघाला जावया स्वर्गीं वर्णवत नाहीं शांती तेथली, जयाचा मुगुट मस्तकीं घाली ... २ वाट बहिणींनो, लांब ती असे, वाटाडी तुम्हाला कोणीहि नसे ख्रिस्त जो पुढारी तो पुढें गेला, अनुसरू आम्ही त्याच्या पाउलां ... ३ तरी बहिणींनो, पाय थकती, तेथें पोंचल्याने काय ये हातीं आनंदी आनंद आनंद भरे मनीं, पाहतांना प्रभूला त्वरें ... ४ ----- --- एमिली आर. बिसल