मराठी
६८१. स्वर्गीय बाळांचा जयोत्सव
वर्ते प्रभूच्या भोंवतीं
हजारो लेकरे
हर्षानें उभी राहती,
तीन गाती सुस्वरे ... १
करा जय जय
करा जय जय हो ... ध्रु
तीं शुभ्रे वस्त्रें घालुनी,
अत्यंत हो तेजाळ
स्वर्गाचें सुख भोगूनि
गातात सर्वकाळ ... २
पूर्वीं तीं जगी असतां
सोशीत दुःखें घोर
आतां तीं सर्व स्मरतां
गातीं ख्रिस्तासमोर ... ३
तीं कशीं गेलीं तरूनी,
कोणीं उद्धरिलीं
जगाला कसें जिंकूनि
तीं गाऊं लागली ... ४
प्रभूने केला हो उद्धार,
स्वरक्तें धूतलीं,
हि त्याचिं कृपा वर्णितां
तीं गात सुटलीं ... ५
ख्रिस्तावरीं ठेवुनी भाव,
टाकीला पापगाळ,
आतां स्तवुनी त्याचें नांव
तीं गाती सर्वकाळ ... ६
----- एच. बॅलेंटाईन