६८२. दिव्य लोकींची सुखें

मराठी

६८२. दिव्य लोकींची सुखें दिव्य लोकीं थोर मित्र असे मुलांप्रती सदॆव ज्याचि प्रीती अढळ राहती किती जगांत मित्र प्रसंगी सोडिती, सुमित्र हा फिरेना स्वर्गीय वरती ... १ दिव्य लोकीं हो विश्रांती मिळे मुलांप्रती, प्रियांस येशूच्या तया मिळे खचित ती कुभाव नाहीं तेथें, शिरे न चिंतनां, लहान ह्याला प्रवाशां सुखाचा अंत ना ... २ वर्ति दिव्य लोकीं जागा असे मुलांप्रती, ती ख्रिस्त येशूसंगे आनंद भोगिती, भूलोकीं त्यांस तैशी कशी न आढळे तिथें सुसौख्य नांदे व दुःख मावळें ... ३ दिव्य लोकीं हो किरीट असे मुलांप्रती, अपूर्व त्याची शोभा व क्रांती दिसती प्रभूवरीं मुलें जी सुभाव ठेविती तीं मात्र तो किरीट शीरींचं घालती ... ४ वर्ति दिव्य लोकीं गाणें असे मुलांप्रति, स्वरास काढितांना प्रभूला वनीती, दुतांस तें न येई ते स्तब्ध राहती, व मात्र तारलेले तें स्तोत्र म्हणती ... ५ दिव्य लोकीं शुभ्र झगा असे मुलांप्रतीं, मिळेल येशुक्रुपे तयांस वरती तया सुशोभनाने मुलें प्रभूसमोर सहर्ष प्रेमें गाती, सुवंद्य मित्र थोर ... ६ ---- मेरी ई. बिसल