मराठी
६८३. याहो या परमेश्वराचा जयजयकार करूं
स्तवु ईश्वरा, चला गौरवु
अपुली तारणशीला ...ध्रु
कृतज्ञ होऊन जयजयकारें
स्तवु तया मंगला ... १
श्रेष्ठ, देव देवाधिप ईश्वर
स्तवु तया निस्तुला ... २
करीं धरीं तो गिरिशिखराला,
अगाध धरणीतला ... ३
तदीय जलधि, तयानेच तो
स्वेच्छेनें निर्मिला ... ४
निर्जल भूमी तयाचीच
तो रचिता झाला तिला ... ५
चला चला हो पूजूं,
अर्पु तयास तनुयष्टीला ... ६
जानुस्थित त्यापुढें होऊं
या करता तो आपुला ... ७
तोच आमुचा देव,
स्वजन हा त्याच्या कुरणांतला ... ८
अधीन त्याच्या कळप
तयाचा त्यानें सांभाळिला ... ९
विचारूनि हित आजच
ऐका तयाचिया वाणीला ... १०
मसामरिबा येथें केलें
मतीला मोहांकूला ... ११
तसेंच आतां नका करुं
हो कठोर निजबुद्धीला ... १२
गुरुजन तुमचा मला पारखी
शोभा देई मला ... १३
निरखी माझ्या कृतीस मजला
वित्त पुरा भासला ... १४
वर्षें चाळीस तिरस्कार हा,
माझ्या मनीं राहिला ... १५
मतीभ्रष्ट हे मार्ग न यांनी
माझा हो जाणिला ... 16
प्रतिज्ञापिलें क्रोधें,
मुकले हे मम विश्रांतीला ... १७
गौरव पितया, गौरव पुत्रा,
पवित्र आत्म्या पुरा ... १८
प्रारंभी होता जो, आहे,
असेलही सर्वदा ... १९
--- ना. वा. टिळक