मराठी
६८५. सृष्ट पदार्थानो, परमेश्वराचें स्तवन करा
परमेशाला स्तवा सदोदित
परमेशाला स्तवा ... ध्रु
प्राणीमात्रहो जगन्निवासी,
जगन्नायका स्तवा ... १
स्वलोकांनो, दूत दिव्य हो,
परात्पराला स्तवा ... २
चंद्रसूर्यनक्षत्रग्रहानॊ,
विश्वव्यापका स्तवा ... ३
मेघ्मृतपर्जन्यहीमांनो,
विश्वव्यापका स्तवा ... ४
ग्रीष्मशरदहेमंतऋतुंनो,
विश्वनियंत्या स्तवा ... ५
प्रभातसंध्याप्रकाशतम हो,
जगतप्रकाशा स्तवा ... ६
गिरीदरीनो, जलाशयानो,
जगन्नायका स्तवा ... ७
पशुपक्ष्यान्नो, जीवजंतूंनो,
जगज्जीवना स्तवा ... ८
वृक्षलतांनो, पुष्पफुलांनो,
विश्वपतीला स्तवा ... ९
जलचर, भूचर, सर्व चराचर,
जगचालका स्तवा ... १०
सानथोरहो मानव सारे,
जगदुद्धारा स्तवा ... ११
प्रभुरायाचे याजक सेवक
साधुसंत, त्या स्तवा ... १२
धन्यवाद गा सदा तयाचा,
महिमा याचा स्तवा ... १३
परमपवित्रा प्रेमळ त्रीतया,
युगानुयुग त्या स्तवा ... १४
--- स. आ. पाठक