६८६. जखर्याचें स्तोत्र

मराठी

६८६. जखर्याचें स्तोत्र धन्य ईश्वरा जगदुद्धारा धन्यवाद तुज देतो प्रभो भेटुनी स्वजनां प्रेमे उद्धरिले, स्तुती गातो ... १ पूर्वभाकीते पूर्वजांस तू दिली पुरीं ती केलीं, दाविदवंशी ताराणशीला आम्हासाठीं आणिली ... २ तारण द्याया, मुक्त कराया रिपुपासून प्रभुराया करार स्मरुनी दया कराया, जीव अमुचा राखाया ... ३ शत्रुपासुनी मुक्त होऊनि सिद्ध तुला सेवाया, निर्भयतेने, पावित्रतेनें आयु तुला अर्पाया ... ४ त्या त्रात्याचा परात्पराचा दूत खरा तू बाळा मार्ग तयाचा सिद्ध कराया जन्म तुझा वेल्हाळा ... ५ कार्य तुझें, सकळां कळवावीं शुभवार्ता मुक्तीची, पापापासून मुक्त कराया आला, त्या प्रभुजींची ... ६ देवदयेने अवतरला इहलोकीं प्रकाश जगाचा प्रकाश व्हाया, अंधकार ज्या जनाभोवतीं, त्यांचा ... ७ मृत्यूच्या छायेत जयांची वस्ती तया दावाया प्रकाश, आम्हा तुझ्या सेवकां शांतिपथीं बा न्याया ... ८ गौरव देवा सर्वसमर्था, पिता पुत्र आत्म्याला, त्रिकाळ होवो, जग हे गावों पवित्र त्या त्रितयाला ... ९ ----- स. आ. पाठक