मराठी
६८८. मरीयेचें स्तोत्र
पवित्र त्याचें नाम सदाचें,
किति धन्यता मज दिधली
भिउनि तयाला वगती त्यातें
दया दाखवी पूर्ण बली ... ध्रु
प्रभूला माझा जीव मानितो थोर,
देव ताराणशीला
आत्मा माझा कृपा बलाने त्याच्या,
अंतरी उल्लसला ... १
दासी मी अति दीन,
परी प्रभू दैन्यावस्था अवलोकी
सर्व पिढ्या ह्या पुढतीं म्हणती धन्य,
धन्य मज या लोकीं ... २
पराक्रमी जो स्वयें तयानें
अहा महत्कृती मजसाठीं
पवित्रता दाविली धन्य हो
माझा प्रभू हा जगजेठी ... ३
निजबाहूंची शक्ती तयाने
जगा कितीदा दाखविली
गार्विष्ठांची गर्वपूर्णशी
हृदये त्यानें भेदीयलि ... ४
ऐश्वर्याने प्रमत्त ऎशा
राजां रँक चीं बनवी झणी,
रंकालागिं बनवी राजे
ऐश्वर्यचिं त्यां देवोनि ... ५
श्रीमंतातें रिक्त करांनी
देत मागुती लावोनि,
बुभुक्षितां परी सुंदर
अन्ने संतोषवितों पूर्ण मनीं ... ६
प्रभूनें अपुलें वाचन स्मरोनी
पूर्वज माझे तोषविलें,
आब्राहामा इस्राएला
सहाय्य त्यानें किती केले ... ७
गौरव पितया, गौरव पुत्रा,
पवित्र आत्मन गौरव ये
पूर्वी होते, आजही आहे,
असेल पुढतीं युगें युगें ... ८
--- आनंदीबाई य. दे. ना. टिळक