मराठी
६८९. शिमोनाचे स्तोत्र
शांतीने निजसेवका प्रभूवरा,
तूं गाऊ देशी अता
तूं त्यातें दिधलें विभो,
वाचन जे ते पावतें पूर्णता
ताराया मनुजांस ज्यांस
जगती देवां तुवां धाडिलें
त्या राया, सदया,
समर्थ प्रभूला मी पामरें पाहिले ... १
दावया सकलां विधर्मी मनुजां
दिव्य प्रकाश प्रभो
इस्राएल जनांस भूषण खरा
आला जगिं तो विभो
होवो गौरव सर्वदा प्रभू तुझा
सर्वत्र विश्वेश्वरा
बापा, पुत्र, पवित्र आत्मन
तुझ्या गावो यशा हि धरा ... २
--- स. आ. पाठक