६९०. स्तोत्र ६७

मराठी

६९०. स्तोत्र ६७ दीनदयाळा दीनावर ह्या करुणा कर रे करुणागारा ... ध्रु चालक आम्ही तूच दयाघन आधिवृष्टी कर आचारा ... १ तूंच प्रकाश प्रभो जगताचा तुभ अमुचे हार परमोदारा ... २ पथ मुक्तीचा, शांतीमुखाचा दावं जगाला, जगदुद्धारा ... ३ जन सारे तुज गावो देवा, करो तुज सेवा जीवनाधारा ... ४ न्याय जगाचा करिशील राया घेशील दिनांच्या कैवारा ... ५ दुःखदुरित हे जाईल सारें फळ सकलां रे देईंल हि धरा ... ६ परमेशा तव आशि अम्हां दे शरण तुला रे धन्य प्रभूवरा ... ७ गौरव गावो सर्व सदा तव बा त्रीविधैका, परमपवित्रा ... ८ ---- स. आ. पाठक