६९१. ऊर्ध्वलोकीं देवाला गौरव

मराठी

६९१. ऊर्ध्वलोकीं देवाला गौरव जय बापा, जय पुत्रा, जय आत्म्या, देवा, आशीर्वाद दयेचा आम्हावर व्हावा जय देव जय देव ... ध्रु पर्मोचचस्थानी हो गौरव देवातें पृथ्वीवरती शांती, प्रसाद मनुजाते आम्ही तुजला स्तवितो, धन्यता गातों थोर तुझे जे वैभव आम्ही अनुभवितों त्यास्तव उपकृत होतों, स्तवन तुझें करितों हे प्रभुराया देवा, स्वर्गाच्या राया देवा, सर्वसमर्था, सर्वेशा, पितया जय देव जय देव ... १ हे एकुलत्या पुत्रा, प्रभू येशू ख्रिस्ता हे प्रभू देवा, आम्हां तूंच दयाकर्ता, देवाच्या कोकरा, पुत्र पितयाच्या हरीशी सर्व जगाच्या राशी पापाच्या प्राप्त दया तव राहो संतत आम्हांशी तूंच जगाच्या अवघ्या पापाला हरीशी, जो तू सकल जगाची पापे हरणारा तों तू कर ह्या अमुच्या विनती स्वीकारा, दक्षिण भागिं बसशी पितयाच्या, ख्रिस्ता, मो तूं आम्हांवरती होईं दयाकरता जय देव जय देव ... २ पवित्र केवळ, तूं , तूं प्रभू केवळ पाता पवित्र आत्म्यासह तूं देवासह ख्रिस्ता तूंच परात्परविभवि पितयाच्या युक्ता तूंच सदा आम्हांवरी होई दयाकर्ता जय देव जय देव ... ३ ना. वा. टिळक