६९५. द्वितीयोद्गार

मराठी

६९५. द्वितीयोद्गार प्रभो, वैभवाने येशील माघारा स्मर या पामरा तेव्हा राया ... १ लुटालूट चोऱ्या केल्या जन्मवरी माझा मीच वैरी झालो ख्रिस्ता ... २ मातेरे जन्माचे केलें मी सर्वस्वी आतां हो मनस्वी पश्चाताप ... ३ तुझ्या पायावरी घेतो लोटांगण देई रे तारण, दीनाला या ... ४ ऐकुनिया टाहो असा त्या चोराचा द्रवला देवाचा पुत्र फार ... ५ सुखलोकीं आज प्रेमे ख्रिस्त सांगे असशील सांगे माझिया तुं ... ६ --- वा. मी. गद्रे