६९६. तृतीयोद्गार

मराठी

६९६. तृतीयोद्गार क्रुसावर माझा खिळीला हो बाळ खोटेनाटे आलं आणुनिया ... १ दीनांचा कैवारी, पाप्यांचा सन्मित्र हेंचि मानपत्र का हो त्याला ... २ उपदेश ज्याचा अमृतासमान असा का सन्मान होई त्याचा ... ३ पवित्र हा बाळ असे अंतर्बाहय त्यास हें असह्य का हो दुःख ... ४ चिंधड्या जाहल्या माझ्या हृदयाच्या लक्षांत हे त्याच्या आले सारें ... ५ अंगाची हो माझ्या झाली लाही लाही माझ्याचकडे पाही तेव्हां प्रेमे ... ६ वदे योहाननास पाहा तुझी आई पुत्र तुझा, बाई सांगे मातें ... ७ निघे जो कराया जगाचें कल्याण त्यास ये मरण क्रुसावरी ... ८ -------- वा. मी. गद्रे